पुणेकरांनो काळजी घ्या! वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

पुणे | पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना पुणेकरांची (Pune) डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसात साधारण जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत.

आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोना वाढणार नाही, असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

कोरोनाचा संसर्ग अनेकांना होत असल्याने आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचानक कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वाढत असल्याने अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संशयास्पद असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेत. रुग्णालयात भरती होणाऱ्यांच प्रमाण कमी असलं तरीही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यात कमी झालेला कोरोना बाधित दर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसात जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना 

“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील” 

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!