चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ डान्सचे असतात. तर काही अभिनय, नृत्य करतानाचे असतात.

विशेष म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही इतके धक्कादायक आणि भितीदायक असतात की, त्यांना पाहिल्यावर लगेचंच आपल्या अंगावरचा काटा उभा राहिल.

आपल्याला माहित आहे की, अनेक लोकांना आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी पाळायचा खूप शौक असतो. कीहींच्या घरी तर एक सोडून दोनदोन प्राणी असतात. यामध्ये बऱ्याचदा कुत्रा आणि मांजराचा नंबर लागतो. पण बहुतांश लोकांना कुत्रा पाळायला जरा जास्तच आवडतं.

कुत्रा सगळ्यात इमानदार प्राणी आहे. त्याचप्रमाणे कुत्रा ज्या ठिकाणीही राहत असतो. त्या घराचे तो अप्रत्यक्षपणे रक्षण करत असतो. सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एक कुत्रा भाजी मंडईमध्ये पिशवी आणि पैसे घेऊन गेला असल्याचं दिसून येतं आहे. आपण यापूर्वी महिलांना नाहीतर पुरूषांना घरातील किराना, भाजीपाला घेण्यासाठी दुकानात जाताना पाहिलं असेल. परंतू या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर चक्क एक कुत्रा भाजी खरेदी करण्यासाठी आला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

व्हिडीओमध्ये काळ्या आणि सोनेरी रंगाचा कुत्रा एका भाजी मंडईत जातो. घेतलेली फळे, भाजी ठेवण्यासाठी त्याने एक बास्केटही आणली आहे. ती त्याने त्याच्या तोंडात पकडली आहे. मंडईत गेल्यावर तो एका फळ विकणाऱ्या महिलेजवळ जातो आणि आपली बास्केट खाली ठेवतो.

त्यानंतर ती महिला त्याच्या बास्केटमध्ये तिच्याकडं असलेली काही फळे वजन करून टाकले. त्याचबरोबर त्याला पैसेही देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/watch/?v=810746189612723&t=10

महत्वाच्या बातम्या-

काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर

‘बालिका वधू’ मालिकेतील ‘या’ तीन प्रमुख कलाकारांची प्राण ज्योत मावळल्यामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला बसला मोठा धक्का!

जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम

सिद्धार्थच्या मृत्यूमागे आहे सुशांतच्या मृत्यूचं रहस्य?

सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर