एकावं ते नवलंच! झोका खेळता-खेळता तरूणाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, स्टंट करण हे सोपं नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जे स्टंट आपल्याला पाहताना सोपे वाटतात परंतू प्रत्यक्षात मात्र तेवढेते सोपे नसतात. त्यासाठी अनेकवेळा सरावही करावा लागतो.

सोशल मीडियावर मुलांचे वेगवेगळे स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर असे असतात की, त्यांच्यावर आपला विश्वासच बसणार नाही.

याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण सहसा एखादी पॅन्ट काशावर तरी बसून, किंवा उभ राहून सावकाश घालतो. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने अनोख्या पद्धीतीने आपली पॅन्ट घातली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका व्यक्ती एका ठिकाणी झाडाला लावलेला झोका खेळत आहे. तो व्यक्ती खूप जोर-जोरात झोका खेळत आहे. त्या ठिकाणी त्याचे दोन मित्रही थांबले आहेत. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरूष उभे आहेत.

काहीवेळानंतर तो झोका खेळत असलेला व्यक्ती खूप जोरात झोका घेतो आणि डायरेक्ट त्याच्या दोन मित्रांनी हातात धरलेल्या पॅन्टमध्ये आपले दोन्ही पाय घालतो. त्याने ज्या प्रकारे पॅन्ट घातली, ती पद्धत पाहून नेटकऱ्यांनी तोंडालाच हात लावला असल्याचं समजतं आहे.

तसेच त्यांचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असल्याचंही समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! ‘युपीएससी’ परीक्षा फस्ट अटेम्टमध्ये क्लिअर करण्याची तरूणाची ‘ही’ अनोखी ट्रिक होतीय सगळीकडे व्हायरल

मगर पकडण्यासाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

घसरगुंडी खेळता-खेळता गेला तोल अन्…, पाहा चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! तरूणाने शेत नांगरण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘अति हुशार त्याचा बैल रिकामा’; पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ