मुंबई | सोशल मीडियावर अनेक मालिकांविषयी चर्चा होत असते. त्यातलीच एक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ नेहमीच चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणावरुन मालिकेतील पात्रही चर्चेत असतात.
अनुपमा मालिकेतील अभिनेत्री अनघा भोसले सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनघानं घेतलेल्या एका अनोख्या निर्णयामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या निर्णयानं सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे लागलं आहे.
अनुपमा मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अनघा आता आपल्याला मालिकेत भूमिका बजावताना दिसणार नाही. त्यामुळे तिचे चाहतेही निराश झाल्याचं पाहयला मिळत आहे.
अनघानं सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे.
अनघानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं की, मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीला रामराम करत आहे.
मी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा असंच मला वाटतं. तुम्हाला माझी चिंता वाटत असेल पण चिंता करण्याची काही एक गरज नाही. मी माझ्या आयुष्यातील अपडेट तुम्हाला देत राहिल.
दरम्यान, अनघानं घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल अनघानं त्यांचं मनापासून आभार मानलं आहे. मात्र चाहत्यांना तिचा हा निर्णय पचवणं अवघड जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”
‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान
‘अनिल परबांचं रिसाॅर्ट तोडून दाखवणार’; किरीट सोमय्या आक्रमक
Gold Rate: सोन्याच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो