चाहता फोटो काढायला आला अन् अभिनेत्रीला किस करुन गेला! अभिनेत्रीही झाली शाॅक, पाहा व्हिडीओ

मुंबई| ‘बिग बॉस 14’च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतला टक्कर देणारी अर्शी खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी ती कुठल्याही विधानामुळं नव्हे तर तिच्या एका चाहत्यामुळं चर्चेत आहे.

सध्या अर्शी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक फॅन चक्क तिला किस करताना दिसत आहे. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे अर्शी खानला खूप मोठा धक्का बसला.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्शी खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्शी विमानतळाच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. एक चाहता तेथे येतो आणि अर्शीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तो सेल्फी घेऊन झाल्यावर अर्शीचा हात पकडतो आणि किस करतो. ते पाहून अर्शी आश्चर्यचकित होते. व्हिडीओमधील तिचे एक्सप्रेशन पाहून ती घाबरली असल्याचे दिसत आहे.

चाहत्याचे वागणे पाहून अर्शी ‘चला चला आता इथून जा’ असे बोलताना दिसत आहे. सध्या अर्शीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

अर्शी खानचा हा व्हिडीओ काहीच क्षणात व्हायरल झाला. काही तासांत 3 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ बघितला. अनेकांना चाहत्याचे हे वागणे खटकले. त्याबद्दलचा संतापही त्यांनी बोलून दाखवला. काहींनी तर चक्क त्या चाहत्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला अर्शीला दिला.

विमानतळावर घडलेल्या या अजब घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्शी नुकतीच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेली होती. त्यावेळी विमानतळावर तिची भेट एका चाहत्याशी झाली. खरं तर कोणीही ओळखू नये म्हणून तिनं बुरखा घातला होता. मात्र, तरीसुद्धा एका चाहत्यानं तिला ओळखलंच.

दरम्यान, अर्शी खानने दोन वेळा बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्यांदा ती बिग बॉस 11 मध्ये आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉस 14 मध्ये ती सहभागी झाली.

बिग बॉसनंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अर्शी का स्वयंवर हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती एका तरुणाला निवडेल अन् त्याच्यासोबत लग्न करेल. अर्थात हे लग्न राखी सारखंच खोटं असेल की खरं हे पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या – 

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने…

‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

‘उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद’ प्रिया बापटच्या…