Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली | देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर अजूनही संपलेला नाही. यूएस संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फौसी यांच्या मते, कोरोना विषाणूची महामारी अद्याप संपलेली नाही आणि लवकरच ओमिक्रॉनचे नवीन व्हेरियंट देखील पुन्हा धुमाकूळ घालू शकतात.

सीएनबीसीच्या मते फौसी म्हणाले की, यूएसमध्ये सुमारे 25 किंवा 30 टक्के नवीन संक्रमण BA.2 सब व्हेरियंटमुळे होते आणि हे लवकरच संक्रमणाचे मुख्य कारण बनू शकतं. अशात या नव्या विषाणूचं पहिलं लक्षण समोर आलं आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या अलीकडील अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना महामारीची चौथी लाट 22 जूनपासून सुरू होऊन ऑगस्टच्या मध्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

आयआयटी कानपूरच्या संशोधकांचं म्हणणं आहे की, व्हायरसच्या नवीन प्रकाराचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की चिंतेची बाब म्हणजे त्याची लक्षणेही आश्चर्यकारक आहेत. कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराच्या बाबतीत, तुम्हाला पोटाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. पण Omicron BA-2 मध्ये तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या येऊ शकतात.

Omicron BA-2 ग्रस्त रुग्णांना मळमळ, अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे, पोटात जळजळ आणि गोळा येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा 

“सतेज पाटील हा माणसं खाणारा माणूस, विरोधकांनो सावध राहा” 

Corona | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ; राज्य सरकारनं उचलंल मोठं पाऊल 

“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, मी त्याला आमदार बनवतो” 

“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?”