…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना

मुंबई | नोकरी करत असताना आपल्याला पगार सुरू असल्याने पौशींची चणचण जाणवत नाही. पण वृद्धापकाळासाठी बचत करणं आवश्यक असतं. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन सरकारने अटल पेन्शन योजना (Yojana) लागू केलीये.

या सरकारी पेन्शन योजनेत (Pension Scheme) सेवानिवृत्ती निधीसाठी पैसे जमा करावे लागतात.

अटल पेन्शन योजनेचा प्रारंभ 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आला. अटल पेन्शन योजना 18 ते 40 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहे.

या योजनेंतर्गत बॅंक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट (Account) सुरू करता येतं. या दोन्हीपैकी एका ठिकाणी तुमचं पूर्वीपासून अकाउंट असेल, तरीदेखील तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.

या योजनेत 20 वर्षांपर्यंत एक ठरावीक रक्कम गुंतवावी लागते. तेव्हा संबंधित व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

तुमचं वय 18 वर्षं असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्हाला 5000 रुपये पेन्शन हवं असेल, तर दरमहा 210 रुपयांची बचत करावी लागेल. जर 1000 रुपये मासिक पेन्शन हवं असेल, तर दरमहा 42 रुपये बचत करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोरींचा भर रस्त्यात राडा; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर 

पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता 

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले… 

“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत”