आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी चिमणीने लढवली ‘ही’ अनोखी शक्कल…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

अनेकदा आपण प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. तर असाच एक पक्षाचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, मुलावर सगळ्यात जास्त प्रेम ही त्याची आई करत असते. आई आपल्या मुलाला वेदना होत असताना पाहू शकत नाही. ती त्या मुलाला कोणत्याही संकटातून वाचवते त्यासाठी तिला तिच्या जीवाची काहीच पर्वा नसते. तर अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये कावळे एका साळुंकीच्या लहान पिल्लाला आपल्या चोचीने मारत असून, त्या साळुंकी पिल्लाची आई आपल्या पिल्लाला त्या दुष्ट कावळ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका कावळ्याने आपल्या पायाखाली साळुकींच्या पिल्लाना दाबून ठेवलं आहे. ते पायाखाली दाबून ठेवलेलं पिल्लू एकदम घाबरून गेलं आहे. हे पाहून त्या पिल्लाच्या आईचा जीव कासाविस होत आहे. त्यामुळे ती आपल्या पिल्लाला कावळ्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे.

परंतू कावळा माघार घेत नाहीय. तरीही साळुंकी आपल्या चोचीने कावळ्याला मारत आहे. तर कावळाही तिच्यावर प्रतिहल्ला करत आहे. तसेच त्याच ठिकाणी आणखी एक कावळाही असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र शेवटी ती साळुंकी आपल्या पिल्लाला त्या दोन कावळ्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवते.

हा व्हायरल व्हिडीओ ‘dbiniou’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओवर कमेंटचा वर्षावही होत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 32 हजार लोकांनी लाईक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

चक्क घरात शिरून तरूणाने केली विधवा महिलेकडे शरिरसुखाची मागणी…

यवतमाळमध्ये एकच खळबळ! तरूणीने रचला प्रियकाराच्या मदतीने…

ह्रदयद्रावक! कोरोना झालेल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी…

तेरा साथ ना छोडेंगे! नवऱ्याच्या मृतदेहाला मिठी मारुन…