पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | राज्यातील थंडी हळूहळू ओसरत चालल्याचं पहायला मिळत आहे. थंडी कमी होत चालली असली तरी अद्याप अवकाळी पावसाची हजेरी कायमच असल्याचं पहायला मिळत आहे.

अवकाळी पावसानं नगरिकांना हैराणंच करुन सोडलं आहे. अशातच  राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांत हवेतील तापमानात वाढ झाली आहे. राज्यात थंडी कमी होत असून किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

पुढील दोन दिवस 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगितलं आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कधीही पडणाऱ्या या पावसामुळे पिकांचं नुकसानं होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे.

सातत्यानं होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे हवामान खात्यानंही सावधगिरी बाळगण्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!