मुंबई | मागील दोन आठवड्यापासून उन्हाळा आणखी तीव्र होत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहे तर दुसरीकडे आसमानी संकट देखील ओढावलं आहे.
पुढील चार दिवस कोकणतील सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड उष्म्यासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावासाची शक्यता आहे.
येत्या चार दिवसात प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने याचा फटका शेतमालावर होण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा या भागांत उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळत आहे. तर नाशिक, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.
रात्रीचे किमान तापमान सध्या वाढत असल्याने राज्यातील अनेक भागात उकाडा जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उष्म्यासह राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गडकरी म्हणाले, “रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालंच म्हणून समज”
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज