राणी बागेतील पेग्विनचं बारसं! केक कापून महापौर पेडणेकरांनी ठेवलं ‘हे’ नाव

मुंबई | शिवसेनेचे युवानेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे  यांच्या संकल्पनेतून मुंबईतील राणी बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. त्यानंतर आता या राणी बागेतील प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

हम्बोल्ट पेंग्विन विभागातील मोल्ट (नर पेग्विंन) आणि फ्लिपर (मादी पेंग्विन )यांच्या जोडीनं काही दिवसांपूर्वी एका पेग्विंनला जन्म दिला होता. आता या पेग्विंनचं नामकरण करण्यात आलं आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील थ्रीडी ऑडिटोरियममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छोट्या पेंग्विनचं बारसं घातलं आहे.

थ्रीडी ऑडिटोरियममधील पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांनी केक कापून नामकरण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. छोट्या पेंग्विनचं नाव आता आँस्कर ठेवण्यात आलं आहे.

राणीच्या बागेतील बंगाल वाघाची जोडी शक्ती आणि करिष्मा यांनी काही दिवसांपूर्वी वीरा या बछड्याला जन्म दिला होता.

वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे, अशी माहिती देखील पेडणेकरांनी दिली आहे.

पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालन करणाऱ्यास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

दरम्यान, पेग्विंनच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने आपल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर यावरून वाद रंगण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू!

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला 

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य