शेतातील नांगरणीवरून दोन भावांमध्ये वाद; कोरोनाबाधित रूग्णानं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

बीड |  काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेडच्या आभावे ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरात क्वारंटाईन केलं जातं आहे.

तसेच रोज कोरोनाबाधित रूग्णासंबंधीत कोणतीना कोणती घटना समोर येत असते. अशातच बीडमध्ये एका कोरोनाबाधिक रूग्णाने एक धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

केवळ नांगरणीच्या वादातून कोरोनाबाधित रूग्ण आपल्या चुलत भावाच्या अंगावर थुंकला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सारूकवाडी येथे घडली आहे.

सारूकवाडी येथील रहिवाशी असलेले सुभाष फुंदे आणि त्यांची आई कुसुम फुंदे या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनाही घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अशातच सुभाषचा चुलत भाऊ दिपक फुंदे आणि त्याचे चुलचे श्रीराम फुंदे हे शेतात काम करत होते. तर कोरोनाबाधित सुभाष नांगरणी करत होता.

दिपक तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर, असं सुभाषला म्हणाला. यावरून दोघात वाद सुरू झाले. काही वेळानंतर संतापलेल्या कोरोनाबाधित सुभाषने आपलं मास्क खाली घेत चुलत भाऊ दिपकवर थुंकला.

त्यानंतर आरोपी सुभाषची पत्नी उषा, आई कुसुम आणि वडील बळीराम हे तिघंही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दीपक आणि त्याचे वडिल श्रीराम फुंदे यांना काठीनं मारहाण केली.

दरम्यान, या सगळ्याची माहिती जवळील पोलिस स्टेशनमध्ये दिली असून, सुभाषवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा आणखीन तपास करत असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…

पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला…

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…