वादळी वाऱ्याने चीनचा काचेचा पूल तुटला; 330 फूट उंचावर लटकच राहिला पर्यटक अन्…..

बिजिंग| काचेच्या गगनचुंबी इमारती आणि पूल बांधण्याच्या बाबतीत चीन अनेकदा नवीन प्रयोग करून जगाचे लक्ष वेधून घेतो. बर्‍याच वेळा हे प्रयोग चीनच्या नागरिकांसाठी घातक ठरतात. चीनमधील लाँगजिंग शहरातील पियान माउंटनवर बनविलेल्या काचेच्या पुलावरील घटना हे त्याच ताज उदाहरण आहे.

जगभरात असे अनेक ब्रीज आहेत, जे पाहूनच धडकी भरते. अशाच ब्रीजपैकी एक म्हणजे चीनमधील ‘ग्लास ब्रीज’ म्हणजे काचेचा पूल.

जोरदार वादळात आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला चीनचा काचेचा पूल तुटून पडला, ज्यामुळे या पुलावर फिरणे एका पर्यटकाच्या जीवावर बेतले होते. 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्यानंतर पुलाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.

वाऱ्यामुळे ब्रिजच्या काही भागातील काचा उडाल्या. त्यावेळी ब्रिजवरुन चालणारा एक पर्यटक 330 फुटांवर लटकत होता. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवले.

काही वेळानंतर अग्निशमन दल, पोलिस आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकाची सुटका केली. सुरुवातीला त्याला रुग्णालयात नेण्यात आले. संबंधित पर्यटक भीतीमुळे प्रचंड तणावाखाली होता. त्यामुळे त्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी समुपदेशन केले.

या अपघाताची छायाचित्रे चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हापासून चीनमधील या काचेच्या पुलाच्या मजबुतीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हा ब्रिज दोन उंच खडकांमध्ये बांधलेला असून तो 430 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे. या पुलाची अप्रतिम छायाचित्रे सोशल मीडियावर उपलब्ध असून ती नेटकऱ्यांना भुरळ घालतात. असा पूल प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, याबद्दल लोकांना विश्वासच बसत नाही. त्याच्या दिसण्यावरून हा ब्रिज ‘बेंडिंग ब्रिज’ म्हणून ओळखला जातो.

त्याचं उद्घाटन 2017 मध्ये करण्यात आलं होतं आणि गेल्या वर्षी तो ब्रिज स्थानिकांसाठी उघडण्यात आला होता. हा ब्रिज चीनमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

चक्क पिंजऱ्यात लॉक केलं डोक; मात्र चावी बायकोच्या हातात,…

चक्क पाण्याऐवजी आकाशातून पडतोय उंद्रांचा पाऊस, पाहा व्हायरल…

कार समोर अचानक आला बिबट्या अन्…, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा…

‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’; आईशी…