नवी दिल्ली | धोका अद्याप संपलेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओनं पुन्हा एकदा म्हटलं आहे की जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे.
कोरोना निर्बंध (Covid ) हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिल्याचं कळतंय.
अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील असुरक्षित लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत. कारण अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे, असं डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन म्हणाल्यात.
मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे.
आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जावं. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास सांगावं, असं WHO चे सरचिटणीस म्हणाले
या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असं नाही. कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकलं आहे, असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमिक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. हा प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं’; केसरकरांचा राणे पितापुत्रांवर हल्लाबोल!
“यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जुन्यांना मूठमाती आणि नव्यांना गाजर दाखवणारा आहे”
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल
“गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाही”
“कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याची मस्ती…”