Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याचं पहायला मिळतंय. मागील दोन वर्षात कोरोनाच्या तिन्ही लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचं दिसून आलं होतं.

अशातच आता लसीकरणामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाल्याचं पहायला मिळतंय. कोरोना झाला तरी आता आरोग्य विभागावर ताण कमी होत असल्याचं पहायला मिळतंय.

असं असलं तरी आता ओमिक्राॅनच्या (Omicron) स्टील्थ व्हेरियंटने जगभर धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये हा व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे चीनमध्ये काही शहरात पुन्हा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे.

आग्नेय आशियाई देशांमध्ये उन्हाळ्यात रूग्णसंख्या मोठ्या संख्येत वाढत असल्याचं पहायला मिळत होतं. अशातच आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली.

BA.2 हा ओमिक्राॅनचा पाचवा व्हेरियंट आहे. स्टील्थ व्हेरियंटला BA.2 नाव देण्यात आलं आहे. स्टील्थ ओमिक्राॅन हा दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील गंभीर इशारा दिला होता.

स्टील्थ ओमिक्राॅन हा हळूहळू चीनसह इतर सर्व देशात पसरेल, अशा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यावेळी त्यांनी भारतात याचा प्रसार होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, भारतात लवकरच चौथी लाट येणार असल्याचा इशारा आयआयटीच्या संशोधकांनी दिला होता. त्यानंतर आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

संसदेत सोनिया गांधींची भाजपवर कडाडून टीका, म्हणाल्या…

 “…तर काँग्रेस भाजपला 2024 मध्ये तगडं आव्हान देऊ शकतं”

 “नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…”

Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर 

चंद्रकांत पाटलांचा नवा खळबळजनक दावा; राजकारणात मोठी उलथापालथ होणार?