पहिल्यांदाच डेटवर गेली तरुणी पण भलतीच फजिती झाली; व्हिडीओ व्हायरल

वॉशिंग्टन | अलिकडच्या काळात तरुणांमध्ये डेटींगचा ट्रेंड खूप वाढला आहे. आपल्या जोडीदारासोबत पहिली डेट म्हटलं की प्रत्येकजण खूप उत्साही असतो. डेटची जोरदार तयारी करून विस्मरणीय आठवणी पहिल्या डेटला बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक जोडपं करत असतं. पहिल्या डेटला काहीतरी विचित्र प्रकार घडून त्याची मजा खराब होऊ नये, असं अनेकांना वाटतं. मात्र, अमेरिकेतील एका तरुणीसोबत पहिल्या डेटला भलताच प्रकार घडला आहे.

एमिली टेडफोर्ड असं या तरुणीचं नाव आहे. एमिलीनं स्वतः डेटवर नेमकं काय घडलं याविषयी व्हिडीओच्या माध्यमातून महिती दिली आहे. एमिलीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट होऊन हसत आहेत. सोशल मिडीयावर एमलीचा हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

एमिली पहिल्या डेटसाठी खूप जास्त उत्साही होती. तिने डेटची जोरदार तयारी केली होती. पण डेटवर गेल्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की ज्याने डेटची संपूर्ण मजाच गेली, असं एमिलीने सांगितलं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे की, एमिलीने तोंडावर हात ठेवलेला आहे. यामुळे एमिलीच्या तोंडाला काहीतरी दुखापत झाली असावी, असंच काहीसं वाटत आहे. पण असं काहीही झालं नाही. एमिली पहिल्या डेटसाठी खूप एक्सायटेड होती. ती मजा मस्ती करण्यासाठी जोडीदारासोबत थीम पार्कमध्ये गेली होती.

कोरोनामुळे अद्याप देखील त्या ठिकाणी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी तोंडाला मास्क लावणं बंधनकारक आहे. यामुळे एमिलीने देखील त्या ठिकाणी गेल्यावर तोंडाला मास्क लावलं होतं. पण एमिलीने तोंडाला मास्क लावल्याने डेटवर तिची चांगलीच फजिती झाली.

एमिलीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, मी ओठांना लिपस्टिक लावली होती. पण मास्कमुळे लिपस्टिक ओठांच्या आजूबाजूला पसरली. माझा हा असा चेहरा पाहून इतर लोक खूप हसत होते.

एमिलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तूफान व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत एमिलीची खिल्ली उडवत आहेत. नेटकरी खिल्ली उडवू लागल्यांतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”

सैराट फेम आर्ची म्हणते, सगळेच चिञपट ‘सैराट’…

जाणून घ्या! किवी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ…

सफाई कर्मचारी ते सुुपरस्टार; वाचा ‘या’…