अहमदनगर | अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून आता जिल्ह्याचं राजकीय तापमान वाढलं आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष जोर लावताना दिसत आहे. अशातच कोपरगावमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवारांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आशुतोष काळे यांनी केेलेल्या कामांचं कौतूक केलं आहे.
दरवेळी आमच्या मतदारसंघातून लाखांच्या मताधिक्यानं निवडून येत असतो. मात्र, तुलनेत तुम्ही येथे काळे यांना दिलेलं मताधिक्य कमी असल्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं.
आम्ही साधू संत नाही आम्हीही माणसंच आहोत. त्यामुळे आम्ही केलेल्या कामावरून आम्ही मतं मागतो, असं अजित पवार म्हणाले. आम्ही दिलेली आश्वासने पुर्ण करून दाखवतो. नाही केली तर पवारांची औलाद नाही, असं म्हणत अजित पवारांनी दंड थोपटले आहेत.
घोडं मैदान जवळच आहे, त्यामुळे आता बघू काय होतंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दिसेलच की तुम्ही काय करताय?, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, नगर जिल्हा म्हणजे अजित पवारांचं आजोळ आहे. यावेळी भाषण करताना अजित पवारांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात
“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही”