मुंबई | अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या बोल्ड व्हिडिओ आणि फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. बोल्ड फोटोपैक्षा पूनम जास्त वेळ तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे.
अशातच आता पूनमने तिच्या बोल्ड अंदाजाविषयी रोखठोक वक्तव्य केलं आहे. तिच्यावर आरोप करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्यांना पूनमने सणसणीत उत्तर दिलं आहे.
अशातच पूनम तिची इमेज, सोशल मीडियावरील पोस्ट आणि पॉर्न इंडस्ट्रीबद्दल खुलेपणाने व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या फाॅलोवर्सची संख्या वाढवण्यासाठी ती बोल्ड फोटो शेअर करते, असं पूनम म्हणाली आहे.
मी असे फोटो जाणूनबूजुन टाकते, तुम्ही जर याला बोल्ड म्हणत असाल तर तो माझ्यासाठी खूप सुंदर शब्द आहे, असंही पूनम म्हणाली आहे.
कदाचीत आपल्या समाजाची मानसिकता वेगळी असेल परंतु मला काही लोकं भेटतात ते माझं कौतुक करतात. काही महिला मला भेटतात तेव्हा सांगतात, की माझ्या पतीला तुम्ही आवडता, असं पूनमने सांगितलं.
अनेकजण माझ्यासोबत फोटो काढतात, त्यामुळे या गोष्टींचं मला काहीच वाटत नाही, असंही पूनम म्हणाली आहे. त्याचबरोबर तीने पाॅर्न इन्डस्ट्रीवर देखील भाष्य केलंय.
काही लोकं म्हणतात, मी पाॅर्न इन्डस्ट्रीचा भाग आहे. पण पाॅर्न आणि इराॅटिका यात खूप अंतर आहे. खरंतर मी पाॅर्न इंडस्ट्रीच्या विरोधात आहे. आपला देश पाॅर्न इंडस्ट्री बनावा, असं मला वाटत नाही, असंही ती म्हणाली.
मी इराॅटिका करते पाॅर्न नाही, माझ्या बोल्डनेसची चर्चा असते. ते खूप सुंदर आहे पण पाॅर्न नाही, असंही पूनम म्हणाली आहे.
दरम्यान, एखाद्या सिनेमात आई आणि बहिणीची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचं देखील पूनमने यावेळी बोलून दाखवलं.
महत्त्वाच्या बातम्या –
शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो…’हे’ काम करा नाहीतर डीमॅट अकाऊंट बंद होईल
रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत
आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू
“तोंड सांभाळून बोललं पाहिजे”, चंद्रकांत पाटलांचं मलिकांना सणसणीत प्रत्युत्तर
हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!