मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराने (Stock market) मोठी उसळी घेतली आहे. सेन्सेक्स सध्या 58,644 वर स्थिरावला आहे तर निफ्टी देखील 17,516 च्या घरात आहे.
बाजारात येणाऱ्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय. त्यातच आता गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.
शेअर बाजारात सततच्या येणाऱ्या आयपीओमुळे पैसे कमवण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळेच डीमॅट खाते उघडण्याचा वेग पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढला आहे.
डीमॅट खातं उघडण्यासाठी KYC अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र, अनेकांनी अद्याप आपल्या खात्याची KYC पुर्ण केली नाहीत. डीमॅट खात्याचं KYC पुर्ण करण्यासाठी आता फक्त थोडेच दिवस शिल्लक आहेत.
मुंबई स्टॉक एक्स्चेंजने याबाबत नुकतीच एक सूचना जारी केली आहे. बीएसई वेबसाइटवर अपलोड केलेल्या या माहितीनुसार, डीमॅट खात्यात KYC अपडेट करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे. त्यामुळे आता फक्त दोन महिनेच शिल्लक असणार आहे.
31 मार्च 2022 पूर्वी डीमॅट खातेधारकांनी KYC अपडेट करण्याची गरज आहे. नाहीतर आगामी आर्थिक वर्षात तुमचं डीमॅट खातं बंद होऊ शकतं. KYC करण्यासाठी तुम्हाला 6 गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.
तुमचे नाव, तुमचा पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची श्रेणी माहिती असणं आवश्यक आहे.
दरम्यान, जे ग्राहक कस्टोडियन सर्विस घेत आहेत. त्यांना त्याबद्दलची माहिती देणं बंधनकारक असणार आहे. असं न केल्यास तुमचं डीमॅट खातं बंद होऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत
आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू
“तोंड सांभाळून बोललं पाहिजे”, चंद्रकांत पाटलांचं मलिकांना सणसणीत प्रत्युत्तर
हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!
जेनेलियाने दिली गुड न्यूज! आता रितेश होणार ‘मिस्टर मम्मी’