मुंबई | सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद चालू आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रकरणानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या नितेश राणे यांना न्यायालयाच्या सुनावणीला सामोरं जावं लागलं होतं. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सरकारी वकील आणि नितेश राणेंच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद झाला होता.
संतोश परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मोठा वादविवाद पहायला मिळाला. आता पुन्हा एकदा हा वाद नितेश राणेंनी चिघळवल्याचं पहायला मिळत आहे.
राणेंच्या अटकेनंतर त्यांना कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावरुनच त्यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर ताशेर ओढल्याचं पहायला मिळालं.
मला रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की माझ्या अंगात शाई टाकून मला मारण्याचा डाव आहे, असं खळबळजनक वक्तव्य राणेंनी केलं आहे. त्या कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळं मी एन्जोग्राफी केली नाही, असं राणे म्हणाले.
न्यायालयीन कोठडीत असताना मला कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यापासून डाॅक्टरांसह मोठा फौजफाटा त्याठिकाणी तैनात करण्यात आला होता. मला डाॅक्टरांनी सिटी एन्जोग्राफी करण्याचा सल्ला दिला पण मी नाकारला, असं राणे म्हणाले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज नितेश राणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजलेली पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!