किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई | काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निशाण्यावर घेतलं होतं. सरकारमधील अनेक नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होेते.

काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर पुण्यातील महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली.

अशातच आता संजय राऊतांनी शिवसेना भवनात वादळी पत्रकार परिषद घेत भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळातंय.

अशातच आता किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांनी भ्रष्टाचार केला. सोमय्या पिता-पुत्राला अटक करावी, अशी मागणी राऊतांनी केली होती.

अशातच आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. संजय राऊत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

त्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील तेथे उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना आता ही बैठक राजकीयदृशट्या महत्त्वाची आहे.

बाप-बेटे जेलमध्ये जाणार… वेट अँड वॉच, कोठडीचे सॅनिटायजेशन सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

 “शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या