‘Omicron मुळे भारतात…’; युएनने भारताला दिला ‘हा’ गंभीर इशारा

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटमुळे एप्रिल ते जून दरम्यान 2.4 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीवर झाला, असा दावा यूएनच्या अहवालात (UN report) करण्यात आला आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा एकदा परिस्थिती डेल्टा प्रकारासारखी बिघडू शकते. अहवालानुसार, एप्रिल ते जून 2021 दरम्यान, कोविड-19 च्या डेल्टा व्हेरिएंटच्या घातक लाटेमुळे 2,40,000 लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण झाला. आगामी काळातही अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीच्या प्रवेशासह जागतिक दृष्टीकोन अवलंबला गेला नाही तर महामारी संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोका बनून राहील, असं UN च्या अहवालात म्हटलं आहे.

दक्षिण आशियापुढे मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. येथे कोरोना लसीकरणाच्या संथ गतीमुळे नवीन व्हेरिएंट अधिक वाढ आणि प्रकरणांची संख्या वाढण्यास प्रोत्साहन मिळे, असंही त्यांनी अहवालात म्हटलंय.

दरम्यान देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 488 वर पोहोचली आहे. देशात 11 लाख 17 हजार 417 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 84 हजार 825 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 13.11 वर गेला आहे.

तसेच महाराष्ट्रात काल 46 हजार 723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीये.

महत्वाच्या बातम्या- 

चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक 

पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम 

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…” 

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर 

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता