जवळपास गेली शंभर वर्षं 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होत आहे. समाजातील महिलांना समान अधिकार देणे आणि सन्मान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुगलने अनोख्या प्रकारे महिलांचा सन्मान केला आहे. गुगल डुडलच्या माध्यमातून गुगलने जगातील सर्व नारी शक्तीचा सन्मान केला आहे.
प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्वं अधिक आहे. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्त्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जाते. अशाच प्रकारची एक प्रशंसा, एक कौतुकाची थाप म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्त्याने गुगलने डूडलद्वारे एक ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे.
या व्हिडीओमध्ये विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना गुगलने डुडलच्या माध्यामातून एका अनोख्या पद्धतीनं स्त्री शक्तीला सलाम केला आहे.
गुगलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये लेखिका राजकारणी खेळाडू अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दिसून येत आहेत. याच महिलांचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन हा दिवस योग्य असल्याचं लक्षात घेऊन गुगलने हा व्हिडिओ त्यांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध केला आहे.
दरम्यान, महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका दिवसाची आवश्यकता नाही. कारण, दरदिवशी महिलांचं महत्त्वं हे कायम तितकंच असतं. पण, हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता याच योगदानाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जागतिक महिला दिन हा 1900 च्या काळापासून प्रकाशझोतात आला. ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्त्वाबाबत बदलांचे वारे वाहू लागले होते. 1908 मध्ये 15000 महिलांनी कामाचे कमी तास, चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कांसाठी न्यू यॉर्क शहराच्या दिशेनं कूच केली होती. ही पहिली महिला चळवळ ठरली. काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट्स येथे 28 फेब्रुवारी या दिवशी पाळला गेला.
हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जावा, ही कल्पना क्लारा झेकिन या महिलेनं मांडली. 1910 साली कोपेनहेगन इथं भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेनमध्ये क्लारा यांनी ही कल्पना मांडली. या कॉन्फरन्सला 17 देशांमधल्या शंभर महिला उपस्थित होत्या. त्या सर्व जणींनी ही कल्पना उचलून धरली.
समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आतापर्यंत जी प्रगती केली आहे, ती साजरा करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर आजही अस्तित्त्वात असलेल्या असमानतेविरोधात आवाज उठविण्यासाठी संप किंवा आंदोलनासारखे मार्गही अवलंबले जातात.
महत्वाच्या बातम्या –
आज सोन्याच्या दरात इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर
रोज गुळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
“राज ठाकरेंच्या आवाहनामुळे राज्यातील कोरोना वाढला आहे”
ऑनलाईन सत्रादरम्यान वकिलाने जे केलं ते पाहून सॉलिसिटर जनरल म्हणाले आम्हालाही…
सर्वसामान्यांंना दिलासा देणारी बातमी! पाहा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?