आता ‘या’ मुलाच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे कोण कधी प्रसिद्धी झोतात येईल सांगता येत नाही. रोज कोणती ना कोणती गोष्ट चर्चेत असतेच. अशा गोष्टी व्हायरल होणाऱ्या काळात अजून एक भर पडली आहे. एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका छोट्या मुलाचा असून त्याच्या गाण्यानं सोशल मीडियावर आग लावली आहे. या व्हिडिओमधे त्यानं म्हटलेलं गाणं तर छान आहेच मात्र त्यानं दिलेल्या हावभावांवर लोक घायाळ झाले आहेत. एवढ्या छोट्याशा वयात मुलांमध्ये किती कलागुण दडलेले असतात याचीच ही एक छोटीशी झलक.

या व्हिडीओत त्यानं गायक अरजीत सिंगनं गायलेलं तुझे कितना चाहने लगे हम है हे गाणं गायलं आहे. हे गाणं त्यानं हावभाव दाखवत, आपलं अभिनय कौशल्य दाखवत, अनोख्या अंदाजात गायलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला.

त्याच्या या निरागस कलेला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दाखवला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावाकडे आपल्या साध्या मोबाईलवर हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला दिसून येतोय. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिला तर तो परत पाहिल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडिया हा एक कलागुणांना वाव देणारं व्यासपीठच बनत चाललं आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळे विषय हाताळलेले व्हिडीओ तुम्हाला पहायला मिळतील. त्याचबरोबर सोशल मीडिया हे एक माहिती, मनोरंजनाचं साधन बनलं आहे.

https://www.facebook.com/MHBhushannews/videos/155449069616351/

महत्वाच्या बातम्या –

‘राजा हिंदूस्तानी मधील तो किंसींग सीन करताना मी…’; करिश्मा कपूरने सांगितला तो किस्सा

नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात कशी झाली? वाचा सविस्तर

‘सैराट’ मधील लंगड्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय ‘हा’नवीन चित्रपट

…..म्हणून सलमान खान सिनेमात अभिनेत्रीला किस करत नाही

ब्युटी ट्रिटमेंट करत असाल तर सावधान; तुमच्यासोबतही ‘हे’ घडू शकतं….