“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा सरळ फटका भारताला बसत आहे. देशातील तब्बल 16 हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत देशात सध्या चिंतेचं वातावरण आहे.

भारत सरकार या युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत मोहिम हाती घेतली आहे. अशातच रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याच मृत्यू झाला आहे.

अनेकजण अद्याप युक्रेनमध्येच अडकून असल्याने आता काँग्रेसने केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाशध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

अजूनही अनेकजण युक्रेनमध्ये अडकले आहे.  भारताच्या विदेश मंत्रालयाशीही मी अनेकदा बोललो असून त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

मी स्वतः अडकलेल्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललोय, त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. भारताचे प्रधानसेवक निवडणुकीत व्यस्त आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत त्यांच्या कुटूंबियांच्या काय वेदना असतील हे ज्यांना मुलबाळ नाही त्यांना काय ते कळणार नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, सगळ्या मुलांना तात्काळ देशात आणलं पाहिजे. सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे व्हावं आणि त्यांना सदबुद्धी मिळो, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये

मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”