मुंबई | गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत.
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. 15 दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे.
या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहेत.
दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 104.61 रुपये प्रति लिटर आणि 95.87 रुपये प्रति लिटर वाढले आहेत. तर मुंबईतही इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय.
मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 119.67 रुपये (84 पैशांनी वाढले) आणि डिझेलचे दर 103.92 रुपये (85 पैशांनी वाढले) इतके झाले आहेत.
यापूर्वी सीएनजीचे दरही किलोमागे 80 पैशांनी वाढले होते. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची नवीन किंमत 61.61 रुपये प्रति किलो झाली आहे. सीएनजीच्या दरातही आठवडाभरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात ते 2.40 रुपये किलोने महागलं आहे.
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती”
Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी
Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा
“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”
कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…