बर्फाचं वादळ छाताडावर झेललं! सध्या फक्त भारतीय सैनिकाच्या व्हिडीओचीच चर्चा; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीय सैनिक (Indian Army Viral Video) देशाचं रक्षण करत असतात. अत्यंत कठीण परिस्थितीतही खडकासारखं उभं राहणं आणि खंबीरपणे संकटांना सामोरं जाणं हे भारतीय लष्कराचे सर्वात मोठं उदाहरण आहे.

कितीही कडक उन्हाळा असो किंवा कडक हिवाळा असो, भारतीय सैनिक सदैव संरक्षणासाठी तत्पर आहे. अशातच आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराचा एक जवान थंडीत बर्फाच्या वादळात आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. भारतीय लष्कराचा हा जवान बर्फात उभा राहून देशाच्या सीमेवर लक्ष ठेवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये बर्फाच्या वादळात एक शूर भारतीय सैनिक हातात रायफल घेऊन कसा उभा असल्याचं दिसत आहे. वादळ इतकं जोरात आहे की सैनिकाच्या गुडघ्यापर्यंत बर्फ साचल्याचं दिसतंय.

परंतु बर्फाचं वादळं देखील जवानाला कर्तव्यापासून मागे हटू शकले नाही. हा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाचे उधमपूरमधील जनसंपर्क अधिकारी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत 50,000 हून अधिक लाईक्स आले आहेत. 11,000 हून अधिक रिट्विट्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतीय सैनिकाचा हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. मी भारतीय लष्कराचा सदैव ऋणी राहीन, असं जितेंद्र सिंह यांनी यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या –

पोरींची भांडणं सोडवायला गेला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर