मॉडर्न नवरीची धमाकेदार एन्ट्री, पाहुणेही झाले अवाक; तुम्हीही व्हिडीओ पाहतच राहाल

मुंबई | लग्न म्हणजे सर्वांच्याच आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. आयुष्यातील या सुखद क्षणाची आठवण कायम रहावी म्हणून अनेकजण वेगवेगळे प्रयोग करतात.

लग्नात नवरा नवरीची एन्ट्री ही धुमधडाक्यात होत असते. काही जण घोड्यावरून तर काहीजण हेलिकाॅप्टरने एन्ट्री करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

इंटिरियर डिझायनर असलेल्या साबा कपूर नावाच्या वधूचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. साबाने लग्नात एका बाॅलिवूडच्या गाण्याने केली आहे.

वधूने सरप्राईज एन्ट्री मारताच चालू असलेल्या गाण्यावर सर्वजण आजूबाजूला उभे राहतात. सर्वप्रथम ती आपल्या आईवडिलांसोबत गाण्यावर नाचते.

ग्रे आणि सिल्व्हर कलरचा लेहेन्गा साबाने घातल्याचं दिसतंय. पुढे जात साबा आपल्या बहिनींसह नाचत आहे. त्यानंतर तिने आपल्या इतर नातेवाईकांसह तिने गाण्याचा ताल धरला.

त्यानंतर पुढे नाचत तिने आपल्या मित्रांसह नृत्यात साथ देते, आणि अखेरीस तिला तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणी साथ देऊ लागतात. यानंतर मात्र व्हिडीओचा शेवटी ट्विस्ट पहायला मिळतो.

अखेरीस मैत्रिणीसह ताल धरल्यानंतर समोर तिचा होणारा नवरा उभा असतो. त्यावेळी ती मागे वळून लपवून ठेवलेली अंगठी बाहेर काढते आणि होणाऱ्या नवऱ्याला गुढघ्यावर बसून प्रपोज करते.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. 2 लाख 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या –

राखी सावंतला भेडसावतेय ‘ही’ भीती, बिग बॉसच्या घरात केला खुलासा

कोरोनाचा हाहाकार! केंद्राने जारी केल्या ‘या’ नव्या गाईडलाईन्स

कझाकीस्तानात तणावाचं वातावरण, सरकारने दिला ‘तो’ हिटलरी हुकूम अन्…

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“हेडमास्तर कुठं गेेले? तो दरारा कुठंय?”, ‘त्या’ कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या