जम्मू | जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.
14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 20 जणांना रेस्क्यू केलं आहे.
जखमी सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितलं की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचं वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे.
माता वैष्णोदेवा मंदिर परिसरात अचानकपे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र या घटनेची माहिती होताच बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. जखमी भाविकांना मंदिर परिसरातून हलवून रुग्णालयात दाखल केले जात आहे.
तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी घटनास्थळी सर्व प्रकारची मदत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेद्रं मोदी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलंय.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जखमी भाविकांना 50 हजार रुपये मदत म्हणून दिले जातील. तर जम्मू-काश्मीर सरकारतर्फे जखमी लोकांना दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन
‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत
‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती
सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा
“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”