आईचा चिमुकलीला दम; उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना का त्रास देताय?

पुणे | पुण्यातील एका चिमुकलीला तिची आई अंतर पाळण्याचं उद्धव काकांचं ऐकणार की नाही? म्हणून विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील हा व्हिडीओ पोहचलाय.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चिमुकलीच्या वडिलांना फोन करत आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता असा प्रेमळ जाब विचारलाय. उद्धव ठाकरेंनी विचारणा केल्याने या कुटुंबाला सुखद धक्का बसलाय.

पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये विश्रांत सोसायटी येथे शिंदे कुटुंब आहे. त्याच्या घरात अंशिका नावाची त्यांची 3 वर्षाची मुलगी आहे. तिची आई तिने या काळात स्वच्छता आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सांगताना व्हिडीओत दिसत आहे.

ही चिमुकली आपल्या आईला पुन्हा नियम मोडणार नाही, पण उद्धव काकांना माझी तक्रार करु नको, अशी विनंती करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

-लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अ‌ॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम

-कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

-केरळच्या हत्तीणीच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय मृत्यूचं कारण?

-“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”