दिल्लीत ऑपरेशन लोटस?; आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्काच्या बाहेर

दिल्ली | देशात सध्या अनेक राज्यांमध्ये सरकारे पडण्याची आणि राजकीय उलथापालथ होण्याची हवा वाहते आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले. बिहारमध्ये देखील आघाडी सरकार बदलले आहे.

आता याच पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) सुद्धा सत्ताबदल होणार का? अशी शंका उपस्थित झाली आहे. दिल्लीचे आम आदमी पक्षाचे (AAP) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआयची चौकशी सुरु आहे.

भाजप राजकीय सुडापोटी आणि आम आदमी पक्षाला बदनाम करण्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप आपने केला आहे. तसेच आपच्या तीन आमदारांना भाजपने प्रत्येकी 20 कोटी रुपये देऊन फोडण्याचा देखील प्रयत्न केल्याचा दावा आपने केला.

या संदर्भात आता मोठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे 62 आमदार आहेत. त्यापैकी अनेक आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे उघडकीस आले आहे.

पक्षाच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार अनेक आमदार संपर्काच्या बाहेर आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी विधीमंडळाची बैठक होणार आहे.

आता सदरहु बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात आणि किती आमदार दांडी मारतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आपने केला आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुका ह्या भाजप (BJP) विरुद्ध आप (AAP) अशा होतील, असे म्हंटले होते.

त्यामुळे आगामी काळात भाजप दिल्लीचे सरकार पाडणार की ते अबाधित रहाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”

मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय तपासात नवीन माहिती समोर

“माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही” – गडकरींच्या भाषणाची चर्चा जोरात

“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार