उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्रीपदासोबत उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी राजभवनात जात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला होता. आठवड्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक आवाहन देखील केलं. उद्या कोणीही बंडखोर आमदारांच्या वाटेत येऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर केले. जनतेच्या आशिर्वादाने अनेक चांगली कामं केली, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार

मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”