आम्हाला सत्तेची हाव नाही पण राज्याच्या विकासासाठी सत्ता हवी आहे – उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईचे संपर्क जाळे वाढवणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा आज (शनिवार) शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे.

येणार तर युतीचचं सरकार येणार. आम्हाला सत्तेची हाव नाही पण राज्याचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ्गारमी निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केला आहे.

मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो. त्या गोष्टी तुम्ही करुन दाखवल्या आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं आहे.

काश्मीर अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार. नरेंद्र मोदींनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे. मोदींच्या रुपाने देशाला खंबीर नेतृत्त्व मिळालं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मला खात्री आहे, लवकरच अयोध्येमध्ये आपलं राम मंदिर सुद्धा आपण उभं करू, असं उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या मुद्द्यावर बोलताना म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या-