“एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thakeray) विधानसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना विरोधकांना नामोहरण केलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या(Central Agencies) वापरामुळं राज्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच विरोधकांच्या सततच्या टीकेला आपल्या खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीशी संबंधितांवर सक्तवसूली संचनालयाकडून छापेमारी केली जात आहे. या पार्श्वभूमिवर वाद वाढला आहे.

भाजपकडून सातत्यानं होणाऱ्या टीकेला देखील ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं आहे. मुंबई वाचवणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका, असं ठाकरे म्हणाले आहेत.

तुम्हाला सत्ता पाहीजे ना सगळ्यांच्य समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करून नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना दिलं आहे.

कुटुंबावर धाडी टाकत हे जे तुम्ही चाळे केले आहेत. त्यामुळं मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरूंगात, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं आहे.

मी कधी तुमच्या कुटुंबाच्या भानगडी काढल्या का?, याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट याला जोडलं जात आहे, या शब्दात ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, विधानसभेत विरोधकांवर टीका करताना राज्याला उद्धव ठाकरे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंनी आता भाजपवर हल्लाबोल करण्याचं ठरवल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”