“…तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो”

मुंबई | देशाच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्र जो आधार देतोय, महाराष्ट्राचं योगदान जर बाजूला ठेवलं तर कदाचित तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नव्या जीएसटी भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. आपल्या कारकिर्दीत अमूक गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. त्यापैकी ही एक वास्तू आहे, असं ते म्हणाले.

वास्तू कर हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाठकणा आहे. करसंकलनात देशात महाराष्ट्र अव्वल आहे. देशातील नंबर एक राज्य आहे. म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती आहे, तिचा महाराष्ट्र मोठा आधार आहे. हा आधार काव्य पंक्तित न ठेवता, शब्दात न ठेवता तो आधार आम्ही दाखवून देतो. दाखवून दिलेला आहे. म्हणून मला वाटतं राजकीय बोलू नये अशा प्रसंगी असं संकेत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या अडीच वर्षापासून आम्ही यावर काम करत होतो. या कामाचं श्रेय अजित पवार यांना जातं. प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागावा लागतो. आज लागला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या राजकीय आयुष्यात आपण पाहिलं अनेक घोषणा होतात. गाजावाजा होतो. नारळवाल्यांचा खप जोरात होतो. नारळ फोडतात. कोनशिला तशाच असतात. त्या शिलेला कोणी विचारत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या वर्षी कोरोनाची साथ….’; WHO प्रमुखांच्या वक्तव्याने टेंशन वाढलं 

Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं 

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे 

सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू 

‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी