“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा

मुंबई | मागील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठे राजकारण तापले होते. यावेळी अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील महत्वाचे नेते भेटले होते.

भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील ठाकरेंची भेट घेतली होती.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत विलीन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपच्या नेत्यांनी मात्र त्याबद्दल कोणताही सुगावा लागू दिला नाही.

आता शिवसेनेने त्याबद्दल भाष्य केले आहे आणि राज ठाकरेंना भाजपसंदर्भात इशारा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत आहे.

वेंदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा, असा प्रश्न त्यांंनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी फॉक्सकॉनबद्दल प्रश्न विचारल्याने शिवसेनेने समाधान व्यक्त केले आहे पण दुसरीकडे त्यांनी हा प्रकल्प गुडरातला घेऊन गेलेले तुमचेच भाजपचे मित्र आहेत, असे देखील ठाकरेंना म्हंटले आहे.

तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीचे सर्व इंजिन डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका राज ठाकरेंनी आताच लक्षात घेतला पाहिजे, असा इशारा शिवसेनेने राज ठाकरे यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”

“देवी-देवतांनी मला सांगितले, डोन्ड वरी, जा भाजपमध्ये“

“अजित पवारांना मुख्यमंत्री करा”, जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंद्यांना काय दिली ऑफर?

दसरा मेळावा वाद: युवासेनेचा शिंदे गटाला मोठा इशारा, म्हणाले शिवतीर्थ…

फ़ॉक्सकॉन प्रकरणी अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना आरोपांचे पत्र; वाचा सविस्तर पत्र