मुंबई | केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलीये.
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायला हवं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी
झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर
“श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडणार”
केतकी चितळेवर शेजाऱ्यांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली