’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केल्याचं दिसतंय. अशात कोरोना रूग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात काल नव्या कोरोनाबाधितांचा आकडा थेट 1 हजाराच्या पार गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM) यांनी तातडीने टास्क फोर्ससोबतची बैठक बोलावली.

या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत निर्बंधाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला नाही. पण त्यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

पुढचे 15 दिवस हे कोरानाबाबत महत्वाचं असणार आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा पंधरा दिवस अभ्यास केला जाईल. पुढच्या 15 दिवसांनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जातील. मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावावा, असं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं आहे.

या बैठकीत राज्यात पुन्हा मास्कसक्ती करायची का? या विषयी देखील चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांचं मत ऐकून घेतल्यानंतर राज्यात सध्यातरी मास्कसक्तीची आवश्यकता नाही, असा निर्णय घेतला.

कठोर नियमावसी नको असेल तर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमाचं पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती! 

“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल” 

करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या… 

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर! 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन