मुंबई | अनेक दिवसांपासून 12 वीचा निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात होते. मात्र आता याबाबत शिक्षण मंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं होतं.
यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या.
यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”
करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…
व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन