…तर त्यांचा ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांची जलीलांवर जहरी टीका

मुंबई | खासदार इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं वावडं असल्याची टीका झाली. शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जलील यांच्यावर शाब्दिक बाण सोडण्यात आले आहेत. जलीलांनी निजामाजी चाटूगिरी करणं थांबवलं नाही तर त्यांचा औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ध्वजारोहण आणि स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्याचा शासकिय कार्यक्रम प्रत्येक वर्षी औरंगाबादेत पार पडतो. आमदार असताना आणि यंदा खासदार झाल्यावर सलग 5 वर्षे जलीलांनी या महत्वाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलाय, असा आरोप शिवसेनेने त्यांच्यावर केला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या एका कार्यक्रमाचं त्यांना आमंत्रण नव्हतं. त्याविषयीचा त्यांनी केवढा बाऊ केला होता. मात्र या कार्यक्रमाचं आमंत्रण असताना देखईल त्यांनी जाणं टाळलं. हा संतापजनक प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या खासदारास कोणत्याही शासकिय कार्यक्रमाला बोलावू नका, असा फतवाच तुम्ही काढा, अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे.

दरम्यान, स्वतःला निजामाचे वारस समजणाऱ्या जलील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील शिवसेनेनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-