…तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत- उदयनराजे भोसले

वाई | मी आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या, त्याकडे माजी मुख्यमंत्र्यांनी साधं पाहिलं देखील नाही. कृष्णा खोरे योजनेतून या भागात वेळीच विकासाची कामं झाली असती, तर या भागात ही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली नसती. या निष्क्रिय अशा रिकाम्या लोकांबरोबर राहिलो तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

माझी प्राधान्यता या भागाच्या विकासाला आहे. मग तो कुठला पक्ष करतो ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी या भागाच्या विकासासाठी मदत केलेली आहे, असं उदयनराजेंनी सांगतिलं आहे.

कृष्णा खोरे योजनेची कामं जर वेळेत पूर्ण केली असती, तर आज ही दुष्काळाची स्थिती आली नसती. पाण्याच्या प्रश्नामुळे एक अख्खी पिढी विकासापासून वंचित राहिली. हे पाप कोणाचं आणि ते कसे फेडणार? आणि पुन्हा तेच राज्यकर्ते मते मागत आहेत, अशा शब्दात उदयनराजेंनी स्वपक्षावरच नाव न घेता टीका केली.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. यामध्ये पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता उर्वरित काही नेतेही लवकरच पक्षांतर करणार असून त्यामध्ये उदयनराजे यांचे नाव आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या-