अखेर भाजपमध्ये प्रवेश करताच उदयनराजेंना ईव्हीएमवरचं उत्तर मिळालं!

सातारा |  देशात लोकसभेची निवडणूक झाली अन् पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आरूढ झालं. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले निवडून आले मात्र त्यांच्या मताधिक्यात कमालीची घट झाली. अगदी काही दिवसांत त्यांनी ईव्हीएमकडे बोट दाखवून याच्यातच नक्की झोल आहे, असं म्हणत कमी मताधिक्याचं खापरं ईव्हीएमवर फोडलं. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश करताच आता त्यांना ईव्हीएमवरचं उत्तर मिळालं आहे.

देशातलं आणि राज्यातलं भाजप सरकार अतिशय उत्तम काम करत आहे. ही कामं करणारी लोकं आहेत. लोक कामाला बघून मतदान करतात, असं म्हणत त्यांनी मला आता ईव्हीएमचं उत्तर मिळालं आहे, असं साताऱ्याच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना म्हटलं.

कामाला लावणाऱ्यांवर निर्णय काय घ्यायचा. त्यांना कामाला लावलं नाहीतर ते तुम्हाला कामाला लावतील. त्यांच्या या कामामुळे मला उत्तर मिळालं, असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यायच्या तयारीत होते. मात्र भाजपप्रवेशाच्या जोरदार हालचाली चालू झाल्या तशी ईव्हीएमची चर्चादेखील त्याच वेगात बंद झाली.

दरम्यान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यायला निघालेले हेच उदयनराजे भोसले होते ना? अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-