मुंबई | राज्यात आता किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीसाठी ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाच वादळ उठल्याचं पहायला मिळतंय.
किराणा दुकानात वाईन विक्री केली जाणार असल्यानं आता भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
खरंतर या राज्य सरकारमध्ये काय चाललंय? हे ना तर या सरकारमध्ये असलेल्यांना कळतंय, ना जनतेला कळतंय, असा टोला दानवेंनी लगावला. चंद्रपूर जिल्हात आम्ही दारूबंदी केली होती आणि लोकांची मागणी होती, असंही दानवे म्हणाले आहेत.
आज वाईन विकायला लागले आहेत, उद्या बिअर विकतील आणि पुन्हा दारू विकायला लागतील, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारचं उत्पन्न वाढवण्याचे अनेक रस्ते खुले आहेत, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
दारू टपरीवर किंवा एखाद्या दुकानावर विकून पैसा उभा करणं हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नसल्याचं देखील त्यांंनी म्हटलंय. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्या ते असंही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील, असं नाही होणार. मला असं वाटतं की, याचं समर्थन कोणीही करू शकत नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मोदी सरकारनं देश विकला, त्यांनी देशद्रोह केलाय”; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा