भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीपीडी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना मागच्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं. पण ताब्यात घेतल्यानंतर या दोघांचा विवाद इतका वाढला की उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना वेगळं करण्यात आलं. भाजपला काश्मीरमध्ये आणण्याच्या मुद्द्यावरुन या दोघांमध्ये वाद सुरु झाला होता.

ताब्यात घेतल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आगपाखड केली. मेहबूबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 2015 आणि 2018 मध्ये भाजपसोबत आघाडी केल्याने भाजप राज्यात पाय रोवू लागली. या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यावेळी तिथे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मेहबूबा मुफ्ती यांनीही ओमर अब्दुल्ला यांनाही जशास तसे उत्तर दिले.

फारुक अब्दुल्ला यांची आघाडी अटलबिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएसोबत होती. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात विलनीकरण करण्याला ओमर यांचे आजोबा शेख अब्दुल्ला जबाबदार होते, अशी आठवण मेहबूबा यांनी ओमर अब्दुल्लांना करुन दिली.

दोघांमधील वाद चांगलाच टोकाला पोहचला त्यामुळे नाईलाजाने पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघांनाही वेगवेगळ्या कक्षेत ठेवण्याचा निर्णय घेतला.

केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका

-रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…

-पाक लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा का?; इम्रान खान यांचा सवाल

-माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी

-राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर