Top news विदेश

कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय

नवी दिल्ली |   जर कोरोनाला हरवायचं असेल तर जगाने एकत्रित आलं पाहिजे आणि कोरोनाचा मुकाबला करून कोरोनाला पिटाळून लावलं पाहिजे, असं मत जागतिक आरोग्य संघटनेने मांडलं आहे.

एकता हे कोव्हिड विषाणूवरचं सगळ्यात जालीम आणि राबबाण औषध असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस यांनी संपूर्ण जगाने एकत्रित येऊन कोरोनाचा सामना करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनाला पराभव करण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. तसंच काय काय उपाययोजना करता येतील, याचा विचार केला पाहिजे. कोरोनाने समान भविष्य घडवण्याची आपल्याला संधी दिली आहे. त्या संधीचा आपण फायदा उठवला पाहिजे, असं ते म्हणाले.

कोरोनाने सगळ्या जगाला किंबहुना जगातील सगळ्या देशांना एकप्रकारे इशारा दिला आहे. इथून पुढच्या काळामध्ये अनेक देशांना लाँगटर्म प्लॅनिंग करणं गरजेचं असल्याचं टेड्रोस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”

-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

-‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

-दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय