मुंबई | काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षावरुन एक वक्तव्य केलं होतं. आतापर्यंत यूपीएचे नेतृत्व काँग्रेसने केलं. मात्र देशामध्ये विरोधी पक्षाची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असं वाटत असेल, तर यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी आमची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊत याच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात एक ठिंणगी पडली आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेसने त्यांच्या भाष्यावरुन नाराजीही व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयावर बोलू नये. तसेच ते शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले होते. मात्र अशातच संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
यूपीए अध्यक्ष पदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील लोकांनी यावर बोलू नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे.
यूपीए विषयी बोलण्यासाठी त्याचा भाग असलंच पाहिजे अंस काही नाही. या देशात भाजप विरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करायची असेल, तर यूपीए विषयी चर्चा झाली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.
हा दिल्लीतील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यावर बोलले तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षाची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या पलटवाराला नाना पटोले काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच काँग्रेसने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट न सोडल्यास राष्ट्रीय स्तरावरील काही नेते यूपीए 2 स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्य स्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण….’…
“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं…
‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल…