मुंबई | आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता पंचतत्वात विलीन झाला आहे. ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेमधून सुशांतला घराघरात ओळख मिळाली होती. याच मालिकेत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आईचं काम केलं होतं. सुशांत गेल्यानंतर उषा नाडकर्णी सुशांतच्या आठवणीने व्याकूळ झाल्या आहेत. ‘आज तक’शी बातचीत करताना त्यांनी सुशांत बरोबरच्या आठवणींवना उजाळा दिला.
सुशांत गेल्याची बातमी कळाल्यावर मी जागेवर कोसळले. मला काय करावं हे काहीच सुचेना. सुशांत असं करूच शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास होता. सुशांत खूप शांत स्वभावाचा होता. तो मनमिळावू होता. त्यावर अशी काय वेळ आली की आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता? असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न उषा नाडकर्णींना देखील सतावतो आहे.
आम्ही जेव्हा पवित्र रिश्तामध्ये एकत्र काम केलं, त्यावेळी शुटिंगमध्ये वेळ मिळाल्यावर आमच्या मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. त्यावेळी तो मला सांगायचा की आई मी बीकेसीमध्ये 2 कोटींचं घर पाहिलं आहे. घर खूप छान आहे. मला ते घर घ्यायचंय. त्यावेळी मी त्याला म्हणायचे की सुशांत तु आताच इंडस्ट्रीमध्ये आला आहेस. तुला लगेच जमेल का घर घ्यायला? तर तो हिमतीने म्हणायचा, हो आई मी नक्की घेईन…, अशा आठवणी उषा नाडकर्णी यांनी सांगितल्या.
सुशांतला गाड्यांची खूप हौस होती. एकदा आम्ही गप्पा मारत असातना त्याने स्कोडा गाडी घेणार असल्याचं मला सांगितलं. एकूणच सुशांत खूप मेहनती होती. कष्ट करण्याची त्याची तयारी होती. मात्र कुठे माशी शिंकली? मला काहीच कळत नाही, असं नाडकर्णी म्हणाल्या.
खरं तर मुलगा बापाचे अंत्यसंस्कार करतो मात्र आता सुशांतच्या बापावर आता सुशांतचे अंतिम संस्कार करायची वेळ आली आहे. हे मनाला खूप वेदना देणारं आहे. मी पुरती उन्मळून पडलीये, अशी भावविवश प्रतिक्रिया उषा नाडकर्णी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार
-असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!
-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
-सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत
-“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”