“वाजपेयींची गाडी मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे वापरली, मोदीजींनी 7 वर्षांत 4 गाड्या बदलल्या”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मर्सिडीज-मेबैक 650 गार्ड बख्तरबंद कारमधून प्रवास करताना दिसणार आहेत. यावरून काँग्रेसनेते नितीन राऊत यांनी मोदींना टोला लगावला. त्यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला.

वाजपेयींनी वापरलेली सरकारी गाडी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढची 10 वर्षं वापरली. मोदीजींनी 7 वर्षांत बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, लँड क्रूझर आणि आता नवी बारा कोटींची मेबाक अशा 4 गाड्या बदलल्या आहेत, असं नितीन राऊत यांनी म्हटलं.

2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय?. देशात महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्सिडीज मेबॅक एस 650 ही नवी गाडी दिल्लीमधील हैद्राबाद हाऊसमध्ये पाहण्यात आले होते. यावेळी या गाडीमधून पंतप्रधान मोदी हे रूसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यास आलं होतं.

या गाडीमध्ये VR10-लेव्हल प्रोटेक्शन या गाडीमध्ये आहे. तसंच 15 किलो विस्फोटकांच्या शक्तीशाली स्फोटातही ही गाडी सुरक्षित राहू शकते. रिपोर्टनुसार या गाडीची किंमत 12 कोटी रूपये आहे.

AK-47 रायफलने होणाऱ्या हल्ल्यापासून देखील ही कार बचाव करेल. गाडीच्या खिडक्यांना आतल्याबाजूने पॉलीकार्बोनेटचे कोटिंग करण्यात आले आहे. या कारच्या अंडर-बॉडीला विशेष प्रकारे तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे स्फोट झाला तरी कारमध्ये बसलेली व्यक्ती सुरक्षित असेल.

कारमध्ये 6.0 लिटर ट्विन टर्बो V12 इंजन आहे. तसेच या गाडीचा टॉपर स्पीड हा 160 kmph आहे. कारला स्पेशल रन फ्लॅट टायर्स आहेत. ज्यामुळे गाडी डॅमेज किंवा पंक्चर झाली तरी गाडी थांबत नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना कधी संपणार?; WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं 

मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश

सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी

भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”

“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार