मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे.
देशात आता 15 ते 18 वयोगटातील तरूणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मान्यता मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ही महत्वाची माहिती दिली.
देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासन सतर्क झालं आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिकांचं 100 टक्के लसीकरण होणं आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्य सरकारकडून ठोस पाऊलं उचलली जात आहेत.
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 3 जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतचा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्व नियोजनाचा आढावा वर्षा गायकवाड या बैठकीत घेणार आहेत.
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना बसमधून टप्प्याटप्प्याने लसीकरणासाठी केंद्रावर आणण्यात येईल. तसेच, लस दिल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेत सोडण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच इतर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे किंवा जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी शासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश
सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी
भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”
“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार
पुणेकरांचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅन रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, वाचा आकडेवारी