मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बैठकीतील सरदेसाई यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं सचिवपद असलं, तरी ते ना लोकप्रतिनिधी आहेत, ना सरकारी अधिकारी. त्यामुळे पर्यटन विषयक बैठकीला सरदेसाईंनी हजेरी लावल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वरुण सरदेसाई राज्य शासनाच्या सचिवांच्या बैठकीत काय करत आहेत? तेही मंत्रालयात, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलावलं असल्यामुळे आपण बैठकीला उपस्थित राहिलो होतो, असं स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 4, 2019
महत्वाच्या बातम्या-
SBI चं जुनं डेबिट कार्ड होणार बंद होणार; जाणून घ्या अधिक! – https://t.co/xe4QJguhmi @TheOfficialSBI #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
“पवारांच्या अनुभवाचा मोरंबा दिल्लीश्वरांना चाखता आला नाही” – https://t.co/83cVHOSq8v @PawarSpeaks @AmitShah @ShivSena @rautsanjay61 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
“आरे, नाणार नंतर आता मराठा मोर्चातील आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घ्या”- https://t.co/8uMCdTiA8z @Awhadspeaks @NCPspeaks @ShivSena @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019